वडगांव येथील निजामिया क्रिकेट क्लब तर्फे विद्युत रोषणाईत आयोजित करण्यात आलेली हाफ पिच सतीश जारकिहोळी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मंगाई स्पोर्ट्स च्या के .आर. शेट्टी किंग संघाने के.एम.सी. गांधीनगर संघाचा पराभव करून एक लाख रुपये आणि सतीश जारकिहोळी चषक पटकाविला. तर उपविजेत्या संघाला समाज सेवक नूर अहमद मुल्ला तर्फे ठेवण्यात आलेले पऩ्नास हजार रुपये आणि चषक प्रदान करण्यात आले.
प्रथम फलंदाजी करीत के.एम.सी. गांधीनगर संघाने 5 ओव्हर मध्ये 41 धावा केल्या . तर प्रत्युत्तर देताना के. आर. शेट्टी किंग संघाने केवळ 3 ओव्हर मध्येच या धावसंख्येचा पाठलाग करून विजय मिळविला. के. आर. शेट्टी संघाच्या आकाश धामनेकर ला सामना वीर म्हणून घोषित करण्यात आले.या वेळी आकाश पत्रावळी बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटसमन म्हणून सचिन पाटील यांना इसमाईल ज्युलेरी चे मालक इबऱाहिम हुक्केरी यांच्या तर्फे स्पोर्ट्स साइकली भेट देण्यात आल्या.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बेळगांव ग्रामीण काँग्रेसचे सेक्रेटरी प्रदीप एम.जे., बेळगांव दक्षिण ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष परशराम ढगे, समाजसेवक नूर अहमद मुल्ला,इम्रान मुरगोड आणि अय्याज जकाती यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेत एकूण 32 संघानी भाग घेतला होता.इम्रान मुरगोड, अय्याज जकाती, जावेद मुल्ला , अप्पाभाई जमादार , जिया पठान,निहाल हकीम, मोहम्मदअली तहसीलदार, फैजान पठान यांनी या स्पर्धेला सफल बनवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.अभिजीत असालकर आणि अश्फाक अश्रफी यांनी या सामन्यांचे धावते समालोचन केले.यूटुब वरून सामन्यांचे प्रसारण करण्यात आले होते.