बेळगांव ता,21. छपरा बिहार येथे होणाऱ्या 67 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा 17वषाखालील मुलींचा संघ विद्या भारतीचे प्रतिनिधित्व करीत गुरुवार ता 21 रोजी सायंकाळी निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस संघ बिहारला रवाना झाला आहे.
बिहार छपरा येथे 25 ते 29 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेसाठी संंत मीरा माध्यमिक मुलींच्या संघात कर्णधार
प्रीती भांदुर्गे, प्रियांका पाटील, श्रद्धा ढवळे, श्रुती सावंत, चैत्रा इमोजी, संस्कृती भंडारी, स्नेहा पाटील, राशी असलकर,जिया बाचीकर, भूमिका कुलकर्णी, कीर्ती मुरगोड, रेनिवार मालशोय खोबोरोज मालशोय, अवम्रिता मालशोय, चांडोरुंग मचास, ओरीना वैरेन, केजोंती ब्रू, सान्वी पाटील या खेळाडूचा समावेश आहे.या संघासमवेत योगेश सांवगावकर,विशाल बेरडे,गिता वर्पे, ज्योती पावले रवाना झाले आहेत तर विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सुजाता दप्तरदार, राघवेंद्र कुलकर्णी ऋतुजा जाधव, चंद्रकांत पाटील, मयुरी पिंगट,व पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे. या संघाला आमदार अभय पाटील, नगरसेविका सारिका पाटील, भरत पाटील, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमण्णाचे ,श्रीरामसेना हिंदुस्तान अनगोळ अध्यक्ष उमेश कुर्याळकर, अनिकेत भोसले, मनोज चवरे यांनी संघाला क्रीडासाहित्य देऊन आर्थिक सहाय्य केले.