नवी दिल्ली 26: भारतात 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस गुरु गोबिंद सिंगांचे सुपुत्र साहिबजादा बाबा जोरावर सिंग आणि साहिबजादा बाबा फतेह सिंग यांच्या पराक्रम आणि बलिदानाची आठवण म्हणून पाळला जातो. यानिमित्त महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त श्री रुपिंदर सिंग यांनी बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त श्रीमती स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या शौर्याला अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक(माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.