मुंबई हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना अभिवादन
सीमा प्रश्नाविषयी महाराष्ट्राने आपली भूमिका स्पष्ट करावी
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने 17 जानेवारी आणि एक जून रोजी हुतात्मा पत्करलेल्या हुतात्म्यांना मुंबई येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन केले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत धारातीर्थ पडलेल्या हुतात्म्यांना आदरांजली यावेळी त्यांनी वाहिली. या चळवळीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या बलिदानाचा महाराष्ट्राला विसर पडला असेल तर त्यांनी सांडलेल्या रक्ताची आठवण करून देण्याकरिता समितीच्या नेत्यांनी मुंबई गाठून या ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन केलं.
तसेच महाराष्ट्र सरकारने तात्काळ देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन सीमा प्रश्न सुटेपर्यंत सीमा भागातील नागरिकांना मूलभूत अधिकार देऊन माणूस म्हणून शांततेत जगू द्यावं जर हे जमत नसेल तर महाराष्ट्रानं सीमा प्रश्न विषयी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी निवेदनाद्वारे शुभम शेळके यांनी केली आहे.