बेळगांव:1969 च्या सीमालढ्यातील बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी 8 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे शिवसेनेने छेडलेले आंदोलन छेडले होते.
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन या आंदोलनात 67 शिवसैनिकांनी हुतात्मे दिले त्या हुतात्म्यांना आज बेळगाव मध्ये अभिवादन करण्यात आले
शिवसेना सीमाभाग बेळगाव तर्फे आज सकाळी कार्यक्रम पार पडला विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
रामलिंग खिंड गल्ली येथील सम्राट अशोक चौक येथे आज सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यासह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी सम्राट अशोक चौकातील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले. यावेळी दोन मिनिटे स्तब्धता पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.