निपाणी खाटीक समाजाचे अशोक मल्लाप्पा कांबळे यांचा दुःखद निधन
बेळगाव: निपाणी खाटीक समाजाचे माजी अध्यक्ष, निपाणी नगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व प्रसिद्ध धान्य व्यापारी, भाट गल्ली निवासी अशोक मल्लाप्पा कांबळे (अकोळकर)(75) यांचे गुरुवार सकाळी निधन झाले.
यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना चार भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवार दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
रक्षाविसर्जन शुक्रवार दिनांक 16 रोजी सकाळी 9 वाजता आहे. अभिनंदन कांबळे आणि सुदर्शन कांबळे यांचे ते वडील होत.