*बलिदान मास उपक्रमांची सांगता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनी कर्नाटक महाराष्ट्र राज्यामध्ये विविध कार्यक्रमाने सांगता*
बेळगांव तारीख 7 एप्रिल 2024 : महाद्वार रोड बेळगाव येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान , छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनी बेळगाव जिल्हासह विविध गावोगावी आणि घरोघरी कर्नाटक महाराष्ट्र गोवा या ठिकाणी धारकऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानिमित्ताने बलिदान मासाची सांगता करण्यात आली; काही ठिकाणी बलिदान मसाज सांगता करण्यात आली तर उद्या काही ठिकाणी सांगता होणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा स्मृतिदिन शिव प्रतिष्ठानद्वारे विविध उपक्रमांतून केला जातो. मागील महिनाभरापासून बलिदान मास कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातून विविध ठिकाणी कार्यक्रम साजरे करण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणी असणारे कार्यकर्ते आणि आबाल वृद्ध , कार्यकर्त्यांनी महिनाभर बलिदान मास पाळला पाळला. यानिमित्त काहींनी मुंडण केले तर काहींनी महिनाभर गोड पदार्थ खाणे टाळले, काहींनी पायात चपला न घालता अनवाणी राहण्याचे व्रत केले. या काळात शहरातील विविध चौकात रोज सायंकाळी संभाजीराजांच्या प्रतिमेचे पूजन होत होते. मात्र, करोनाच्या कारणाने गर्दी करण्यास मज्जाव केला गेल्याने केवळ दोन सदस्यांद्वारे प्रतिमापूजन केले गेले.
तसेच मूक पदयात्राही रद्द केली गेली. मात्र, बलिदान मास उपक्रमांची सांगता झाल्यानंतर काहींनी रक्तदान केले तर काही ठिकाणी करोनामुळे कायदा सुव्यवस्थेसाठी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना चहा-पाणी-नाष्टा तसेच काही ठिकाणी भिक्षेकऱ्यांसाठी जेवणाचे डबे दिले गेल्याचे काही ठिकाणी दिसून आले होते. विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवा संभाजी महाराजांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणे अत्यंत महत्त्वाचे असून ते विचार या बलिदान मासाच्या काळात पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
_________