खास दीपावलीनिमित्त श्री मसनाई स्पोर्ट्स क्लब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी अगसगे येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
हि भव्य मॅरेथॉन स्पर्धा 14 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता सुरू करण्यात आली. यावेळी मॅरेथॉन मध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांनी पाच किलोमीटर अंतर पार केले.
यावेळी अगसगे ग्रामपंचायत पासून सुरू झालेली ही मॅरेथॉन स्पर्धा गुड्डादेवी आत रोड पर्यंत जाऊन परत तेथून माघारी अगसगे ग्रामपंचायत येथे संपन्न झाली . यावेळी या स्पर्धेमध्ये अनेक प स्पर्धकांनी भाग घेतला होता यावेळी प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विजेत्याला दहा हजार रुपये देऊन गौरविण्यात आले.