This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*डी मीडिया आयोजित आकर्षक गणेश मूर्ती आणि देखावा स्पर्धेचा निकाल जाहीर*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

डी मीडिया आयोजित आकर्षक गणेश मूर्ती आणि देखावा स्पर्धेचा निकाल जाहीर

गेल्या तीन वर्षांपासून डी मीडिया गणेशोत्सव काळात आकर्षक श्री गणेश मूर्ती आणि देखावा स्पर्धा आयोजित करत असते. दरवर्षी या स्पर्धेमध्ये हजारो स्पर्धक भाग घेत असतात. यावर्षी सुद्धा हजारो स्पर्धकांनी भाग घेतला होता आणि त्याच्या बक्षीस वितरण समारंभ काल कोरे गल्ली शहापुर येथील सरस्वती वाचनालयाच्या माई ठाकूर सभागृहात उत्साहात पार पडला.

यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके केपीसीसी सदस्य आणि सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यक मलागौडा पाटील आपटेक एव्हिएशन अँड हॉस्पिटल अकॅडमीचे बिझनेस पार्टनर विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या ज्योती बामणे , रोलर स्केटिंग अकॅडमी चे सूर्यकांत हिंडलगेकर आणि सामाजिक सेविका प्रज्ञा शिंदे उपस्थित होत्या.

प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकात डी मीडियाचे सर्वेसर्वा दीपक सुतार यांनी डी मीडियाच्या कार्याची ओळख सांगितली . आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर विजेत्या स्पर्धांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र गिफ्ट वाउचर आणि आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी दोन वेगवेगळ्या गटात स्पर्धकांनी पारितोषिक पटकाविले.

यामध्ये

देखावा विजेते

1) सचिन कलखांबकर,चांद्रयान-

2,) यल्लाप्पा सुतार,उसाचे गुऱ्हाळ-

3)विनोद मेणसे,मामाच्या गावाला जाऊया-

4)जितेश नाईक,रेल्वे स्टेशन-

5)लक्ष्मण सुभाष मायण्णा-

6)ओंकार मनवाडकर-

7)महादेव चौगुले-

8) बाळेकुंद्री बंधू- अक्षय

मूर्ती विजेते

1)शेखर गवस-

2)प्रकाश हरजे-

3) करण चौगुले-

4) शिवम हुलजी-

5) प्रथमेश मोहनगेकर

6) स्नेहल पवार-

7) राहुल दड्डीकर-

8)कारेकर व पाटील घराण्याचा गणाधीश- यांनी पटकाविले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार श्रीधर पाटील यांनी केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now