This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*चार लाख मोतीचुर लाडू वितरित करण्याचा आणि दहा हजार व्यक्तींच्या हातावर श्री रामाचे टॅटू काढण्याचा संकल्प*

*चार लाख मोतीचुर लाडू वितरित करण्याचा आणि दहा हजार व्यक्तींच्या हातावर श्री रामाचे टॅटू काढण्याचा संकल्प*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अयोध्येत बावीस जानेवारी रोजी श्री रामाची प्रतिष्ठापना होणार असल्याने बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी चार लाख मोतीचुर लाडू वितरित करण्याचा आणि दहा हजार व्यक्तींच्या हातावर श्री रामाचे टॅटू काढण्याचा संकल्प सोडला आहे.

गेल्या दोन दिवसापासून लाडू तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासाठी राजस्थानहून चाळीस आचारी बोलावण्यात आले आहेत.एकूण ऐंशी हजार घरामध्ये डब्यातून लाडू वितरित करण्यात येणार आहेत.एका डब्यात पाच लाडू असणार आहेत.लाडू तयार करण्याच्या कामात आमदार अभय पाटील यांचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत.यामधे भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.घरोघरी लाडू वितरित करण्याच्या कार्याला आज पासून प्रारंभ करण्यात आला आहे.

श्री रामाचे टॅटू काढून घेण्यासाठी तीन हजार व्यक्तींनी नाव नोंदणी केली आहे.केवळ बेळगाव नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोकांनी देखील नाव नोंदणी केली आहे.एकूण पाच ठिकाणी टॅटू काढण्यासाठी केंद्र उघडण्यात आली आहेत.महीलांच्यासाठी टॅटू काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24