This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*दमदार पावसामुळे बळीराजाला दिलासा*

*दमदार पावसामुळे बळीराजाला दिलासा*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दमदार पावसामुळे बळीराजाला दिलासा

बेळगाव शहर आणि परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून दमदार पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

सोमवारी रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता .मंगळवारी सकाळी मात्र जोरदार पावसाला सुरुवात झाली.दमदार पावसामुळे वातावरण गारठून गेले.दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने भात तसेच अन्य पिकांना जीवदान मिळाले आहे.पेरण्या झाल्या नंतर पावसाने दडी मारली होती.अधूनमधून रिमझिम पाऊस येत होता पण त्याचा पिकांना उपयोग झाला नाही.

त्यामुळे पिके जगवण्यासाठी अनेकांनी विहिरीतील पाणी सोडून पिके वाचवली होती.मंगळवारी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनता सुखावली आहे.संततधार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आणि शहरातील सखल भागात पाणी साठलेले पाहायला मिळाले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24