बेळगांव:नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात श्रीराम जन्मभूमी आयोध्येतून आणलेल्या अक्षता पवित्र कलशाचे सकाळी स्वागत करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ज्योतिर्लिंग देवस्थान येथून पवित्र अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली.
नार्वेकर गल्ली गवळी गल्ली गोंधळी गल्ली समादेवी गल्ली या मार्गावरून पवित्र अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी बैलगाडी मध्ये श्रीराम सीता मैया लक्ष्मण आणि हनुमान ची वेशभूषा साकारून चिमुकली आनंदी दिसत होती.ठिकठिकाणी यावेळी पवित्र मंगल अक्षता कलशाचे आरती करून स्वागत करण्यात आले.