जलतरण स्पर्धेत दोन पदक प्राप्त
बेळगाव आबा स्पोर्ट्स व हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू दिशा राजेश होंडी हिने भुवनेश्वर (ओरिसा) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत दोन पदक प्राप्त करत यश मिळविले आहे.
तिने कर्नाटक राज्यामध्ये आपल्या ग्रुपमध्ये प्रथम स्थानावर असणाऱ्या दिशाने 4×50 मी. फ्रीस्टाईल रीले व 4×50 मी. मिडले रीले शर्यतीत उत्कृष्ट कामगिरी करत सुयश मिळविले आहे .दिशा ही आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू तसेच भंडारी स्कूलची विद्यार्थिनी आहे .तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
तसेच तिने भुवनेश्वर येथील राष्ट्रीय वयोगट जलतरण स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करताना मुलींच्या ग्रुप 3 मध्ये दिशा होंडी हिने एक सुवर्ण व एक रौप्य अशी 2 पदके पटकाविली आहेत .
आबा हिंद क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, रणजीत पाटील, सतीश धनुचे संदीप मोहिते, मारुती घाडी, किशोर पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तर आबा क्लबचे चेअरमन ॲड. मोहन सप्रे, अध्यक्ष अरविंद संगोळी, शितल हुलबत्ते आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.