रतनची एअर एशिया इंडियासाठी सुरक्षा अधिकारी म्हणून निवड
अपटेक एव्हीएशन अकॅडमी मध्ये आज रतन याळगी यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला . रतनची एअर एशिया इंडियासाठी सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झाली असल्याने त्याचा सत्कार करण्यात आला .
रतन येत्या 2 मे पासून त्या आपल्या कर्तव्यावर रुजू होणार आहेत. यावेळी सत्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री.विनोद बामणे (बिझनेस पार्टनर ऍपटेक बेळगाव), श्रीमती ज्योती बामणे (एमडी श्री सरस्वती इन्फोटेक) आणि श्री.प्रकाश पाटील (शाखा व्यवस्थापक) उपस्थित होते यावेळी यांच्या हस्ते रतनला सन्मानित करण्यात आले.
यावेळी रतन ने एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये चांगले करिअर कसे करावे यासाठी फ्रेशर्स बॅचला उत्तम प्रेरणा दिली.त्यानंतर विनोद बामणे यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि एव्हिएशन इंडस्ट्रीतील करिअरमध्ये कसे पुढे जावे याबद्दल मार्गदर्शन केले आणि एअर एशियासाठी निवड झाल्याबद्दल रतन याळगी यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.