जगदीश शेट्टर यांची घर वापसी: काय म्हणाले राज्यसभा सदस्य इराणा कडाडी
राज्यसभा सदस्य इराणा कडाडी यांनी आज कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी घर वापसी केली असल्याचं सांगितलंय.
राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर देशातील संपूर्ण राजकीय वातावरण बदललय.त्यामुळे कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजपामध्ये पुन्हा प्रवेश केलाय . त्याच विषयी बोलत असताना खासदार इरांना कडाडी ते म्हणाले की जसं महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. त्याच प्रकाराचे नेते देखील कर्नाटकात आहे.त्यामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण सुद्धा बदलण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा निवडणुकीदरम्यान जगदीश शेट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र आता राम मंदिराच्या उद्घाटनानंतर संपूर्ण देशातील वातावरण बदलले असल्याने त्यांनी पुन्हा भाजपमध्ये घर वापसी केली आहे. आज सकाळी त्यांनी दिल्ली येथे भाजप पक्षात प्रवेश केलाय यामुळे काँग्रेसला चांगला धक्का बसलाय.