तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवार दि. २० रोजी लोकायुक्त अधिकाऱ्यांची जनसंपर्क सभा होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत होणाऱ्या या जनसंपर्क सभेत सरकारी कामासाठी अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या विलंबाबद्दल नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत.
लोकायुक्त पोलीसप्रमुखांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. तालुका पंचायत सभागृहांत ही जनसंपर्क सभा होणार असून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यात येणार आहेत.
सरकारी कार्यालयातील कामे करून देण्यास अधिकाऱ्यांनी विलंब धोरण अनुसरल्यास तक्रार करता येणार आहे. जर शासकीय कामांसाठी अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केली असेल, बेहिशेबी मालमत्ता जमविली असेल तर अशा अधिकाऱ्यांबद्दल थेट लोकायुक्त विभागाला माहिती देण्याचे आवाहनही पोलीसप्रमुखांनी केले असून अधिक माहितीसाठी ०८३१-२९५०७५६ क्रमांकावर संपर्काचे आवाहन केले आहे.