मानवधिकार सेना कर्नाटक राज्य बेळगावच्या वतीने मराठा मंडळ डेंटल कॉलेज बॉक्साईट रोड येथे आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी रॅगिंग आणि अंमली पदार्थांचे सेवन या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम सहयाद्री नगर येथील मराठा मंडळ दंत महाविद्यालय येथे पार पडला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रहदारी वाहतूकच्या पोलीस उपाआयुक्त पी व्ही स्नेहा उपस्थित होत्या.यावेळी या जनजागृती कार्यक्रमात रॅगिंग आणि अंमली पदार्थांचे सेवन या विषयवार त्यांनी विध्यार्थांमध्ये जनजागृती केली.
तसेच अंमली पदार्थामुळे होणारे दुष्परिमाण यावर सखोल माहिती देण्यात आली.आणि रँगिंगमुळे इतरांच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे त्यांनी सांगितले.
त्याचबरोबर जर महाविद्यालयात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी रॅगिंग होत असेल तर त्या बाबत आवाज उठवून गुन्हा नोंद करण्याचे आवाहन केले तसेच कॉलेज मध्ये एक कंप्लेंट(तक्रार ) बॉक्स ठेवून विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्याचे आवाहन त्यांनी या जनजागृती कार्यक्रमात केले.