This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*सौंदत्ती येथील डोंगरावरील श्री रेणुका देवी च्या  परिसरात भक्तांकरिता चांगल्या सोयी उपलब्ध करून द्या*

*सौंदत्ती येथील डोंगरावरील श्री रेणुका देवी च्या  परिसरात भक्तांकरिता चांगल्या सोयी उपलब्ध करून द्या*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सौंदत्ती येथील डोंगरावरील श्री रेणुका देवी च्या  परिसरात भक्तांकरिता चांगल्या सोयी उपलब्ध करून द्या

ज्याप्रमाणे शिर्डी येथील साईबाबा मंदिर, तिरुपती येथील बालाजी मंदिर या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटकातील सौंदत्ती येथील डोंगरावरील श्री रेणुका देवी च्या  परिसरात भक्तांकरिता चांगल्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आज रेणुका भक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.

यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदा हजारे या म्हणाल्या की सौंदत्ती यल्लमा देवस्थान येथे भाविक मोठ्या प्रमाणे निधी देत असतात त्या निधीचा वापर कुठे होतो ज्याप्रमाणे तिरुपती येथील बालाजी मंदिर शिर्डी येथील साईबाबा मंदिर मध्ये भक्तांना थांबण्याकरिता जागा आहे तसेच स्वच्छतेचे वातावरण आहे त्याच प्रकाराचे स्वच्छतेचे वातावरण सौंदत्ती यल्लमा डोंगरावर करावे अशी मागणी यावेळी केली.

त्यानंतर त्या पुढे म्हणाले की जोगणभावी येथे भाविकांना चे कपडे इतरत्र पडलेले असतात आंघोळी करण्याकरिता महिलांना जागा नसते तसेच कपडे बदलण्याची सोय नसते या ठिकाणी सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे दर्शन घेण्याकरिता असून तास रांगेमध्ये थांबावे लागत आहे.

पाचशे रुपये दिले तर थेट दर्शन होते मात्र शंभर रुपयाच्या लाईन मध्ये तासन तास थांबावे लागत आहे तसेच ऊन पावसामध्ये नागरिकांचे आणि भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यामुळे या सर्व परिस्थितीचा विचार करून उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा महिला एकत्रित येऊन तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी दिला.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24