चिक्कमंगलोर येथील वकिलाला पोलिसांनी मारहाण केल्याचा निषेध करून वकिलांनी संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.
चिक्कमंगलोर येथील एक वकील विना हेल्मेट दुचाकी चालवत होते म्हणून पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली आहे.
हेल्मेट घातली नाही म्हणून त्यांना दंड करणे योग्य होते पण तसे न करता त्यांना बेदम मारहाण केली आहे.मारहाण केलेल्या पोलिसांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वकील संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.वकील संरक्षण कायदा त्वरित लागू करावा अशी मागणीही वकिलांनी केली आहे