संकेश्वर बार असोसिएशन मध्ये सराव करणारे वकील सागर माने यांच्यावर त्यांच्या गावी सोलापूर येथे हल्ला करण्यात आला त्यामुळे याच्या निषेधार्थ आज बेळगाव वकील संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले .
या निवेदनात त्यांनी आरोपी विरुद्ध योग्य ती पावले उचलावीत आणि त्याला अटक करावी अशी मागणी केली या घटनेमध्ये पोलिसांना आरोपींना पकडण्यात अपयश आले आहे .
त्यामुळे वकिलावर झालेल्या हल्ल्याचा आणि कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यात आणि दोषींवर कारवाई करण्यात पोलिसांच्या निष्क्रियतेचा निषेध यावेळी वकील संघटनांनी केला.
त्याचप्रमाणे आरोपींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.