तायक्वांदो मास्टर राव यांचे “आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक – लेव्हल II” ला पदोन्नती
बेळगाव जिल्हातील प्रसिद्ध तायक्वांदो तज्ञ, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि प्रशासक, भारतीय वायुसेनेचे तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर राव यांना वर्ल्ड तायक्वांदो संघटनेने लेव्हल २ आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक म्हणून पदोन्नती दिली आहे.
तायक्वांदो मास्टर राव यांच्यासह जगभरातील संबंधित राष्ट्रीय फेडरेशनने शिफारस केलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो कोच लेव्हल-1 ग्रेडच्या एकूण ११ रँकधारक उमेदवारांनी १५ जानेवारी ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत वर्ल्ड तायक्वांदोद्वारे आयोजित केलेल्या नियोजित ऍडव्हान्समेंट कोर्स मध्ये भाग घेतला.
७-दिवसीय कोर्सच्या अभ्यासक्रमामध्ये जागतिक तायक्वांदो फेडरेशनचे नियम आणि शासन, स्पर्धा नियम आणि त्याचे केस स्टडीज, वैद्यकीय निगा आणि ऑंटी-डोपिंग, ऍथलीट सुरक्षा, क्रीडा मानसशास्त्र, खेळ व्यवस्थापन आणि प्रशिक्षण कौशल्ये असे विषय समाविष्ट होते .
तायक्वांदो मास्टर राव यांनी अंतिम लेखी परीक्षेत ९५% गुण प्राप्त करून ‘आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक – लेव्हल II’ या पदावर पदोन्नती मिळाली आहे, यासह त्यांनी ग्रेड-४, ग्रेड-६, ग्रेड-१० आणि ग्रेड-१४ दर्जेच्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राष्ट्रीय संघचे प्रशिक्षक आणि हेड ऑफ टीम म्हणून काम करण्यास पात्र आहेत.
यापूर्वी २०२० मध्ये, तायक्वांदो मास्टर राव यांनी लेव्हल-१ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक परीक्षा उत्तीर्ण केली आणि या कामगिरीबद्दल कर्नाटक सरकारने त्यांचा सत्कार केला होता. तसेच जून २०२३ मध्ये, दक्षिण कोरिया प्रजासत्ताकच्या क्रीडा, संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या पूर्ण प्रायोजकत्वासह सोल आणि मुझू येथे आयोजित पार्टनरशिप तायक्वांदो प्रोग्राम साठी वर्ल्ड तायक्वांदो महासंघ कडून भारतीय मास्टर्स पैकी एक म्हणून निवडून, यांनी सहभाग घेतले होते.