मूळ महालिंगपूर गांवचे आणि सध्या बेळगाव येथील बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयातील इतिहास विषयाच्या प्राध्यापिका शिल्पा मुदकप्पगोळ यांना हंपी कन्नड विश्वविद्यालयातर्फे पीएच.डी. पदवी बहाल करण्यात आली.”बेळगाव जिल्हा ख्रिश्चन समाजाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अध्ययन” हा त्यांचा पीएच.डी चा विषय होता.त्यांना खानापूर सरकारी प्रथम दर्जा महाविद्यालयाचे इतिहास प्रमुख डॉ. चंद्रकांत ताबोजी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
प्रा. शिल्पा यांच्या या कार्यामध्ये त्यांचे आई-वडील आणि परिवाराचा विशेष योगदान राहिला. महालिंगपूर गांवामध्ये प्रा.शिल्पा यल्लप्पा मुदकप्पगोळ प्रथम स्त्री पीएच.डी धारक ठरल्या आहेत. त्यांच्या या पदवीमुळे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजु, माजी प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर, प्राचार्य डाॅ. एच.जे.मोळेराखी आणि प्राध्यापक वर्ग यांनी विशेष कौतुक केले आहे.