रायबाग तालुक्यातील सिद्धापूर गांवचे सध्या बेळगांव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात कन्नड विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवा बजावीत असलेले प्रा. पांडुरंग गाणिगेर यांना बेळगाव राणी चन्नम्मा विद्यापीठातर्फे कन्नड विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. त्यांचा संशोधनाचा विषय “कन्नड साहित्य चरित्राच्या संदर्भात कर्नाटक कविचरीत” हा होता.
त्यांना या शोध कार्यामध्ये राणा चऩ्नमा विद्यापीठ बेळगांव चे कन्नड विभागाध्यक्ष प्रा. एस.एम.गंगाधरया यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. पांडुरंग गाणिगेर यांच्या या उल्लेखनी कार्याबद्दल मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजु, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि मित्रमंडळींनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे.