This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

June 2023
S M T W T F S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्राचा उद्घोष !*

D Media 24

हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

हिंदूंच्या जमिनी बळकावू पहाणार्‍या ‘वक्फ बोर्ड’चे पाशवी अधिकार काढून घेण्यासाठी संघटिपणे आवाज उठवा ! – श्री. मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

बेळगावी- हलालच्या आर्थिक जिहादप्रमाणे मुसलमानांच्या वक्फ बोर्डाकडून लॅण्ड जिहाद चालू आहे. वक्फ बोर्डाला या कायद्याने हिंदूंची घरे, दुकान, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळे यांसह सरकारची संपत्ती बळकवण्याचे पाशवी अधिकार देण्यात आले आहेत. बेळगावी शहर आणि ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी हिंदूंची भूमी हडप केल्याचे प्रकार उघड होत आहेत. वर्ष 2009 मध्ये वक्फ बोर्डाकडे 4 लाख एकर असलेली भूमी आज 8 लाख 60 हजारहून अधिक एकर भूमी झाली आहे. एवढी भूमी वक्फ बोर्डाकडे कशी आली ? भारत सरकारच्या ‘भारतीय सेने’कडे सर्वाधिक 18 लाख एकर भूमी, तर ‘भारतीय रेल्वे’कडे 12 लाख एकर भूमी आहे. या दोघांच्या नंतर देशभरात तिसरी सर्वांत मोठी संपत्ती वक्फ बोर्डाकडे आहे. वक्फ कायदा रहित केला नाही, तर काही वर्षांत भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाची झालेली असेल. तरी भारतात चालू असलेला सर्वांत मोठा ‘लॅण्ड जिहाद’रूपी काळा कायदा रहित करण्यासाठी हिंदूंना संघटितपणे आवाज उठवावा लागेल, असे आवाहन, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये केले. ते 19 मार्च या दिवशी मालिनी परिसर, वडगाव मेन रोड, शहापूर पोलीस ठाण्याजवळ, भारत नगर, शहापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र जागृती सभेत बोलत होते.

या सभेसाठी मोठ्या संख्येने हिंदूंनी उपस्थिती दर्शवून हिंदु राष्ट्राचा उद्घोष केला. या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर, तसेच रणरागिणी शाखेच्या बेंगळुरु जिल्हा समन्वयक सौ. भव्या गौडा यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह आजूबाजूच्या गावातील धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी शंखनादानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. पुरोहित चैतन्य छत्रे आणि त्यांचे सहकारी यांनी वेदमंत्रपठण केले. हिदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा बेळगावी जिल्हा समन्वयक श्री. हृषिकेश गुर्जर यांनी मांडला. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आणि कु. दिव्या शिंत्रे यांनी केले.

‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा ! – श्री. मनोज खाडये
श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले, ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ म्हणवणार्‍या भारतातील बहुसंख्य 78 टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) हे विभाग असतांना ‘जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खाजगी मुसलमान संस्था उत्पादकांकडून हजारो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेत. भारतातही ‘जमियत उलेमा-ए-हिन्द’ देशभरातील विविध बाँबस्फोटांत सहभागी मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्‍या ‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा.

कालमहिम्यानुसार वर्ष 2025 ला कलियुगांतर्गत सत्ययुग म्हणजेच हिंदु राष्ट्र येणार आहे ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
अलिकडच्या काळात हिंदु युवतींचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी नैराश्यातून, कधी तरुण त्रास देतात यामुळे, तर कधी अन्य कारणांमुळे. हिंदु युवतींना साधना, धर्म यांचे महत्त्व न पटल्याने त्यांना सामाजिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे आत्मबल-मनोबल नाही. याला तोंड देण्यासाठी आजच्या युवतींनी साधना करणेही आवश्यक आहे.
आज भारतात इस्लाम आणि ख्रिस्ती, तसेच अन्य अल्पसंख्यांक पंथांना विशेष संरक्षण दिले गेले आहे; पण देशातील बहुसंख्यांकांच्या, म्हणजेच हिंदु धर्माला कोणतेही राजकीय संरक्षण प्राप्त नाही. त्यामुळे भारतात अल्पसंख्यांकांच्या विरुद्ध अन्याय घडल्यास ‘अल्पसंख्यांक आयोग’ असतो. अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक विकास मंत्रालय’ असते किंवा ‘सच्चर आयोग’ आदी बनवले जातात. बहुसंख्यांक हिंदूंना मात्र कुठलेही राजकीय संरक्षण नसल्याने ना त्यांच्या अन्यायाविषयी ‘बहुसंख्यांक आयोग’ आहे, ना त्यांच्या विकासासाठी ‘बहुसंख्यांक विकास मंत्रालय’ आहे. तरी हिंदुबहुल देशात अल्पसंख्यांकाना लाभ, तर हिंदूंवर अन्याय ही स्थिती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे. येणारा काळ हा आपत्काळ आहे. असे अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनी सांगितले आहे. भूकंप, उष्णतेची लाट, महापूर, टोळधाड, वादळे, यांसारख्या संकटांची मालिका चालू आहे. नुकतेच तुकीये, सिरीया येथे आलेल्या विनाशकारी भूकंपात 25 सहस्रहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तसेच तेथे अजूनही भूकंप होत आहेत. कालमहिम्यानुसार वर्ष 2025 ला कलियुगांतर्गत सत्ययुग म्हणजेच हिंदु राष्ट्र येणार आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी साधना करून धर्माचरणी व्हा, असे आवाहन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

केवळ हिंदू मंदिरांना सरकारीकरणाच्या नोटिसा हे कसले ‘सेक्युलॅरिझम्’ ? अधिवक्ता नीलेश सांगोलकर
आपल्या देशातील ‘सेक्युलर’ म्हणवून घेणारे शासन केवळ हिंदूंची मंदिरे ताब्यात घेते, तर मशिदींसाठी स्वतंत्र ‘वक्फ बोर्ड’ आणि चर्चसाठी ‘डायोसेशन सोसायटी’ असते ! हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदु धर्मासाठी नव्हे, तर मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी वापरला जातो. दक्षिण भारतातील एकूण 1 लाख 18 हजार मंदिराचे सरकारीकरण झाले आहे. निधर्मी शासनाचा हिंदूंच्या मंदिरात हस्तक्षेप का ? बेळगावी शहरातील दक्षिण काशी कपिलेश्‍वर मंदिरासह जिल्ह्यातील 49 मंदिरांवर व्यवस्थापन समिती स्थापन करण्याच्या संबंधी धर्मादाय विभागाने नोटीस दिली आहे. ‘क’ वर्ग देवस्थानात पुढील 3 वर्षांसाठी 9 जणांची समिती स्थापन करण्यासाठी आवेदन मागवले आहेत. अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर व्यवस्थापन समिती नियुक्ती करण्याच्या नोटिसा कधी देण्यात आल्या आहेत का ? त्यामुळे निधर्मी शासनप्रणालीत केवळ हिंदूंच्याच मंदिरांना सरकारीकरणाच्या नोटिसा देण्यात येतात ही कुठली समानता आणि हे कसले ‘सेक्युलॅरिझम्’ ? असा प्रश्‍न अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी या वेळी उपस्थित करून या संदर्भात हिदूंनी संघटितपणे आवाज उठवण्याचे आवाहन केले.

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र ! – सौ. भव्या गौडा, रणरागिणी शाखा
‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे; ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे; त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून किंवा बलात्कार करून त्यांना ब्लॅकमेल करणे यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत. कर्नाटकातील हुबळी येथील अपूर्वा या हिंदु युवतीला तिच्या धर्मांध नवर्‍याने कुर्‍हाडीने तुकडे करून ठार मारले. धर्मांध संघटना ‘पीएफआय’ची शाखा असलेली ‘शाहीन गँग’च्या मुस्लीम युवती हिंदू युवतींशी प्रथम मैत्री करत आणि नंतर त्यांची ओळख मुस्लीम युवकांशी करून देत. हेच मुस्लीम युवक नंतर हिंदू तरुणींची फसवणूक करत. हे अतिशय भयावह आहे. ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ आणि ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे’, यांमुळे हिंदु मुली धर्मांतरीत होतात. त्यामुळे हिंदू युवतींनी लहानपणापासून मुलीला धर्मशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू भगिनींनो, ‘लव्ह जिहाद’ हा हिंदु मुलींच्या भावनांशी केलेला खेळ असून तो धर्म-परंपरा यांवरील संकट आहे. त्यामुळे, वेळीच सावध होऊन याविरोधात तोंड देण्यासाठी सज्ज व्हा !

उपस्थित पक्ष-संघटना-संप्रदाय – हमारा देश, भगवे वादळ, बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, भाजप, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वारकरी संप्रदाय, हिंदू राष्ट्र सेना, विविध स्थानिक संघटना-संप्रदाय

उपस्थित मान्यवर – बेळगाव दक्षिण भाजपचे आमदार श्री. अभय पाटील, कर्तव्य महिला मंडळाच्या सौ. अक्काताई सुतार, ‘एजंल फाऊंडेशन’च्या सौ. मीना बेनके, श्रीराम सेनेचे श्री. बाळू कुरबर, श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. रवी कोकीतकर, बेळगाव येथील भाजप आमदार अभय पाटील यांचे बंधू श्री. देवचंद पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय जाधव, देसूरचे ग्रामपंचायत सदस्य पंकज घाडी, सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी, पू. शंकर गुंजकर,

क्षणचित्रे
१. सभास्थळी क्रांतीकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व विषद करण्यासाठी बालचमूंनी क्रांतीकारक आणि पारंपारिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्कार कक्ष उभारण्यात आला होता. याद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत होते.
२. सभेच्या समारोपप्रसंगी स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

D Media 24

Leave a Reply