काॅलेज विद्यार्थी वर्गासाठी इंग्रजी, हिन्दी, कन्नड,मराठी, संस्कृत विषयात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यानी भाग घेतला, प्रत्येक विषयांमधून तीन विजेते क्रमांक आणि तीन उत्तेजनार्थ ,पारितोषिक देण्यात आली.
या कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा सचिन पवार, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्रा अनिल खाण्डेकर, जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा एस पी सांबरेकर,भाषा विभाग प्रमुख प्रा डाॅ ए एस कोळी, संगणक विभाग प्रा सोनिया चिठ्ठी, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख प्रा राजू सुकाय, उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाण पत्र वितरण करून स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.
या स्पर्धेचे आयोजन विद्यार्थी वर्गातील कलागुणांना उजाळा देणे या दृष्टीने प्रा रेश्मा सपले यांनी केले.
विजेत्या स्पर्धकांची घोषणा राजसी गोजगेकर, अनन्या फगरे,सृष्टी बागेवाडी, प्रणीषा चोपडे या विद्यार्थीनी समुहाने केला, आभार प्रदर्शन विद्यार्थीनी प्रतिनिधी डिंपल पुरोहित यांनी केले, सुत्रसंचालन तन्मय कुरूंदवाड या विद्यार्थ्याने केले.