बेळगांव ता,6. अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या मुला मुलींचा वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेचा बक्षीस समारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.
बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पदकविजेती अथलेटिक खेळाडू वैभवी बुद्रुक, अपूर्वा नाईक , वैष्णवी येतोजी ,शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उपमुख्याध्यापिका उपमुख्य ऋतुजा जाधव, उपस्थित होत्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ओमकार ,सरस्वती, भारत माता फोटो पूजन करण्यात आले ,किरण पावसकर यांनी प्रास्ताविक केली ,रूपाली जोशी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर प्रीती भांदुर्गे,व श्रद्धा ढवळे आकांक्षा बोकमुरकर,अंजली चौगुले यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, यानंतर शालेय स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, सातवी व आठवी विभागात सोहेल बिजापूरे व भावना बेर्डे तर माध्यमिक विभागात सोहम ताशीलदार ,अभिषेक गिरीगौडर व मुलींच्यात नताशा चंदगडकर यांनी वैयक्तिक चॅम्पियन पटकाविली.
याप्रसंगी क्रीडा शिक्षक चंद्रकांत पाटील ,मयुरी पिंगट, तिलोत्तमा गुमास्ते ,माया निलजकर, चंद्रकला,निला धाकलूचे प्रेमा. मेलीनमनी, श्रद्धा मेंडके,सविता पाटणकर,रूपाली जोशी, धनश्री सावंत, विजयालक्ष्मी वक्कुंद विशाल बेर्डे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर यांनी केले शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.