मर्चंट सोसायटीच्या वतीने प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार
बेळगाव: अनसूरकर गल्लीतील दी बेलगाम मर्चंट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने पॉईंट अर्बन बँक चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांचा सत्कार करण्यात आला.
मंगळवारी सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन नारायण चौगुले, प्रमुख पाहुणे म्हणून मराठा बँकचे संचालक व माजी चेअरमन बाबासाहेब काकतकर आणि समर्थ अर्बन ऑपरेटिव्ह सोसायटीचे अजय सुनाळकर , सोसायटीचे अध्यक्षा सौ कुमुद भाटिया व्यासपीठावर उपस्थित होत्या.
प्रारंभी शाखा चेअरमन नारायण यांनी प्रास्ताविक करून प्रदीप अष्टेकर ,बाळासाहेब काकतकर व वकील अजय सोनाळकर यांच्या परिचय करून दिला. चेअरमन नारायण चौगुले यांनी सोसायटीच्या आर्थिक कारभाराचा आढावा घेऊन सोसायटी 2023 मध्ये रोप्य महोत्सव भव्य स्वरूपात करणार आहे अशी माहिती दिली .
चेअरमन प्रदीप अष्टेकर यांचा पायोनियर बँक मध्ये 106 कोटीच्या ठेवी जमविल्याबद्दल तसेच बँकेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिल्ली येथे केंद्रीय सहकार खात्याने त्यांचा खास गौरव करण्यात आला आहे .बेळगाव सहकार क्षेत्रात प्रथमच अशी गोष्ट घडली आहे .हा बेळगाव शहरातील सहकार क्षेत्राच्या मानाचा तुरा खोवल्यासारखे आहे .
यासाठी मर्चंट सोसायटीच्या वतीने प्रदीप अष्टेकर यांचा शाल व श्रीफळ अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून अष्टीकरांचे अभिनंदन केले. त्यानंतर बाळासाहेब काकतकर व वकील अजय सोनाळकर यांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रदीप अष्टेकर म्हणाले सहकारी बँकांवर आरबीआयने अनेक जाचक नियम बसविण्यात आले आहेत. त्यामुळे बँक चालवणे म्हणजे मोठी कसरत आहे.बँकेचे संचालक व सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे आम्ही यश मिळवले आहे .ठेवीदारांनी आमच्यावर विश्वास ठेवल्याने आम्ही ही गरुड झेप घेतली आहे.
मराठा बँकचे संचालक बाळासाहेब काकतकर आणि समर्थ सोसायटीचे चेअरमन वकिल अजय सोनाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रवी नाईक यांनी प्रदीप अष्टेकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला .ज्येष्ठ संचालक व वकील अशोक बुळगुंडी यांनी आभार मानले.यावेळी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक अशोक रायकर, शिवाजी चव्हाण, नितीन पवार, सोसायटीचे जनरल मॅनेजर श्रीकांत मकवान, शाखा मॅनेजर संतोष फडतरे, सल्लागार संचालक संजय ओझा, कायदेशीर संचालक वकील सुरेश जरळे ,वकील प्रभाकर शेट्टी ,वकील उमेश यरडाल, एन आर रायकर ,वकील नितीन हिरेमठ तसेच सोसायटीच्या कर्मचारी वर्ग आणि पिग्मी एजंट उपस्थित होते.