श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तानाजी गल्ली विभाग व नरवीर तानाजी युवक मंडळ यांच्याकडून बलिदान मास पूजेचे आयोजन यावेळी ध्वज पूजन विभाग प्रमुख प्रमोद चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शहर प्रमुख अनंत चौगुले यांनी केले ब्रह्मलिंग पूजन शिवप्रतिष्ठानचे माजी शहरप्रमुख अजित जाधव यांनी केले या यावेळी युवकांना अजित जाधव यांचा मार्गदर्शन लाभले
*असंख्य संकटे, अत्याचार आपल्याला आजच्या काळातही गिळण्यास तयार आहेत, म्हणजेच आपला नायनाट करण्यासाठी सज्ज आहेत, परंतु या अशा कठीण परिस्थितीत आपण शंभूराजेंना आठवलं पाहिजे त्यांनीही अनेक अन्याय अत्याचार सहन केले मृत्यू त्यांना गिळण्यास मोठ्या ताकदीने सज्ज होता परंतु ते जराही ठगमगले नाहीत, स्वराज्यधर्मासाठी शंभूराजे मृत्यूरुपी जळत्या रणात एखाद्या तलवारी प्रमाणे लखाकले , त्यांच्या सारखे धर्मवीर पुन्हा होऊ शकत नाही.*
*सूर्यालाही घाम फोडेल अशी दाहक त्यांची धर्मभक्ती होती, जर आपल्याही मनात अशी धर्मभक्ती जागवायची असेल तर या महान शिवपुत्रांना आपण आपल्या चित्तात वसवले पाहिजे.* यावेळी तानाजी गल्लीतील पंचमंडळ बंडू भातखंडे रवींद्र हुलजी राजाराम देसाई रतन हेरेकर नंदू पाटील विनायक हुलजी शिवम हुलजी निसर्ग चव्हाण प्रतीक शेळके सावली चव्हाण श्रेयस चव्हाण वेदांत चव्हाण शरद चव्हाण गुरुनाथ होसुरकर गजानन पवार माझी गल्लीतील युवक आणि युवती आणि प्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते