पत्रकार संघाला नमवित पोलीस संघ विजेता.
बेळगाव तारीख 3 व्हॅक्सिन डेपो मैदानावरील खडक गल्ली येथील श्री स्पोर्ट्स क्लब आयोजित तिसऱ्या श्री चषक जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळण्यात आलेल्या प्रदर्शनीय लढतीत सुपर ओव्हर मध्ये पत्रकार संघाला नमवित पोलीस संघाने श्री चषक पटकावला.
पहिल्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हाथवे केबल संघाने सहा षटकात 6 बात 55 केले त्यांच्या नारायणने 30 धावा केल्या प्रत्युत्तरादाखल खेळताना पोलीस संघाने 5 षटकात 3 बाद 57 धावा करीत सामना 7 गड्यांनी जिंकला.
दुसऱ्या ओपन प्रथम फलंदाजी करताना पाणीपुरवठा मंडळ संघाने सहा षटकात सहा बाद 61 धावा केला प्रतिउत्तर दाखल करताना पत्रकार संघाने 4.1 षटकात 3 बाद 64 धावा केल्या व सामना 7 गड्यांनी जिंकला ,त्यांच्या चंद्रकांत पाटील 2 षटकार 3 चौकारासह नाबाद 34 धावा केल्या.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पोलीस संघाने 5 षटकात 5 बाद 46धावा केल्या त्यांच्या शशीने 27धावा केल्या. प्रतिष्ठान खेळताना पत्रकार संघाने 5 षटकात 3 बाद 45 धावा करीत सामना टाय केला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना पत्रकार संघाने 9 धावा केल्या प्रत्युरादाखल खेळताना पोलीस संघाने शेवटच्या चेंडूवर 3 धावांची आवश्यकता असताना दर्यापाने षटकार खेचित संघाला विजयश्री खेचून देत विजेतेपद मिळवून दिले.