बेळगाव परिसरातील डोंगराळ भागात हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.
पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.धाडीत 5700 लिटर हातभट्टी दारू आणि साहित्य पोलिसांनी जप्त केले.पोलिसांनी धाड टाकताच दारू तयार करणाऱ्या नी पळ काढला.एक जण मात्र पोलिसांच्या ताब्यात सापडला.अनेक घरावर देखील धाड टाकून दारू साठा जप्त करण्यात आला.दारू तयार करण्यासाठी लावलेल्या भट्टया देखील कारवाईच्या वेळी पोलिसांनी उध्वस्त केल्या.पळून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्तांनी प्रसार माध्यमांना दिली.