This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2024
S M T W T F S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*पद्मावती देवीचा जन्मोत्सव उत्साहात साजरा*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पद्मावती देवीचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

शेट्टी गल्ली येथील जैन मंदिररात आज पद्मावती देवीचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी पद्मावती देवीला पाळण्यात घालून गाणे म्हणण्यात आले.त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी 108 कलश मधून देवीला दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर देवीवर पुष्पवृष्टी करून धार्मिक विधी पार पाडण्यात आल्या.

दरवर्षी मार्च महिन्यात मूळ नक्षत्रावर देवीचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट असल्याने हा उत्सव अत्यंत साधीपणाने साजरा करण्यात आला होता.मात्र आता देवीचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात शेट्टी गल्ली येथे पार पडला.

त्यानंतर या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भडकल गल्ली खडक गल्ली शेट्टी गल्ली येथील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच भाविकांनी देवीच्या दर्शनाकरिता मोठी गर्दी केली होती.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now