This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EntertainmentLocal News

*ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच सेन्सॉरशिप कक्षेत येणार*

*ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच सेन्सॉरशिप कक्षेत येणार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच सेन्सॉरशिप कक्षेत येणार

नवी दिल्ली :अॅमेझॉन, प्राईम, नेटफ्लिक्स, डिज्नी, हॉटस्टार यासारखे ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच सेन्सारशिप कक्षेत येणार आहे. केंद्र सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालय नवे ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. मंत्रालयाकडून ओटीटी, सॅटेलाईट केबल टीव्ही, डीटीएच, आयपीटीव्ही, डिजिटल न्यूज आणि चालू घडामोडींसाठी नवीन नियम तयार केले जात असून यानंतर ओटीटी – प्लॅटफॉर्म हे ब्रॉडकास्टिंग नेटवर्क

 

ऑपरेटर म्हणून ओळखला जाणार आहे. जर कोणताही ऑपरेटर आणि ब्रॉडकास्टरने नियम न पाळल्यास सरकार त्यांच्या कंटेटची चौकशी करेपर्यंत आणि तो डिलिट करेपर्यंत घालून दिलेल्या तासांपर्यंत ऑफ एअर राहण्यापासून ते संबंधित प्लॅटफॉर्मवर बंदी घालू शकते. ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी त्रिस्तरीय सेल्फ रेग्युलेशन सिस्टम असेल. यामध्ये संबंधित प्लॅटफॉर्मच्या स्तरावर कंटेट इव्हॅल्युएशन कमिटी (सीईसी) स्थापन करेल आणि सीईसी प्रमाणित केलेले कार्यक्रमच प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. तर सरकार त्या कार्यक्रमाचा आकार आणि ऑपरेशनची संपूर्ण माहिती सरकार निश्चित करणार आहे. यामध्ये असोसिएशन, १५ ते २० ओटीटी असेल आणि तक्रारी ऐकण्यासाठी एक अधिकारी असेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24