बेळगांव:श्रीकृष्ण भावनामृत संघ इस्कॉन यांच्या वतीने बेळगाव शहरांमध्ये रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते . धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक येथून पूजन करून या रथयात्रेला सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर शहराच्या विविध मार्गावरून रथयात्रा निघाली. यावेळी या मार्गावर युवतींनी रांगोळ्या घातल्या होत्या. रथयात्रेत महिला युवती अबालवृद्ध युवक श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन होऊन पुढे मार्गक्रमण करत होते .
तसेच या रथयात्रेमध्ये अनेक देखावे देखील सादर करण्यात आले होते.26 वर्षापासून बेळगाव मध्ये श्रीकृष्ण भावनामृत संघाच्या वतीने रथयातत्रा पार पडते.उद्या इस्कॉन मंदिर शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे रात्री महाप्रसाद होणार आहे