केएलएस संचलित श्री वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य श्रीमती श्री देवी मलाज यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुण बाहेर पडावेत आणि त्यांचे आरोग्य तंदुरुस्त रहावे याकरिता दरवर्षी वसंतराव पोतदार पॉलीटेक्निक मध्ये स्पर्धा पार पडतात.
यावेळी वार्षिक क्रीडा स्पर्धेमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामुळे क्रीडा सचिव प्राचार्य एसएच भगवती यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांचे नियम व महत्त्व काय आहे यावर मनोगत व्यक्त केले.यावेळी या स्पर्धेकरिता कॉलेजमधील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तसेच शिक्षकांनी देखील यावेळी क्रीडा स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटला