“नुडी नमन” या विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन
ज्ञान योगाश्रम विजयपुर, मल्लिकार्जुन अध्यात्म केंद्र, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या स्मरणार्थ आणि सेवेसाठी “नुडी नमन” या विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली .
यावेळी आयोजकांनी प.पू. श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या अनुयायांना आणि भक्तांना अनोख्या आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि नमन करण्याची विनंती प्रसार माध्यमांद्वारे केली .
हा आयोजित कार्यक्रम सत्संग भवन विश्रांत आश्रम, बेळगुंदी येथे सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023 सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 पार पडणार आहे .या कार्यक्रमा करिता KSRTC बसेसची व्यवस्था सकाळी 8:30 ते 10:30 पर्यंत केली असल्याचे देखील यावेळी आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.