सीमा भागातील मराठी भाषा संस्कृती व परंपरा याचे संवर्धन आणि शिवकालीन इतिहास आत्मसात करण्याबरोबरच मराठी विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धा परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आज बेळगाव मध्ये भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या शाळांनी यामध्ये सहभाग घेतला असून सीमा भाग मर्यादित भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गटात पार पडत आहे .तसेच 1800 हुन अधिक विद्यार्थंनी या स्पर्धेत भाग घेतलाय .ही स्पर्धा मराठा मंदिर मध्ये पार पडत आहेत.