This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*माहेश्वरी अंधशाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

माहेश्वरी अंधशाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहेश्वरी अंधशाळेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

सदर पत्रकार परिषद माहेश्वरी अंधशाळेमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष कृष्णा भट्टड आणि वादीराज कलगटगी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.

यावेळी ते म्हणाले की माहेश्वरी अंधशाळेचा यंदाचा सुवर्ण महोत्सव पार पडत आहे त्यानिमित्त तीन दिवस शाळेमध्ये विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. सदर कार्यक्रम हा एक दोन आणि तीन डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमांमध्ये देणगीदार तसेच उच्च पदावर गेलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.

तसेच या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाकरिता एक डिसेंबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून आसामचे गव्हर्नर गुलबाचंदजी कटारिया उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर भारत सरकारचे कोळसा आणि खान मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तसेच पहिल्या दिवशी खासदार मंगला अंगडी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी आमदार अभय पाटील प्रभाकर कोरे महांतेश कवटगीमठ माजी आमदार अनिल बेनके संजय पाटील जिल्हाधिकारी नितेश पाटील जिल्हापंचायत चे अधिकारी हर्षल भोयर उपस्थित राहणार आहेत.

त्याचबरोबर शनिवार दिनांक 2 डिसेंबर रोजी प्रमुख पाहुणे म्हणून हुकेरी मठाचे चंद्रशेखर स्वामीजी रुद्राक्ष मठ नागनूर शिवबसवनगर येथील डॉक्टर आलमप्रभू स्वामीजी हे आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित राहणार आहेत तसेच याच दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज होती एच के पाटील मंत्री सतीश जारकीहोळी हे देखील उपस्थित राहणार आहेत.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आमदार राजू सेठ प्रकाश हुक्केरी जिल्हाधिकारी नितेश पाटील आयुक्त अशोक दुडगुंटी तरुण भारत ट्रस्टचे किरण ठाकूर उपस्थित राहणार आहेत.

त्याचबरोबर रविवार दिनांक 3 डिसेंबर रोजी आश्रम विद्या आश्रम चे चितप्रकाश आनंद स्वामीची हे उपस्थित राहणार असून या दिवशीही विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राहणार असल्याची माहिती आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now