श्री शनेश्वर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
शुक्रवार दि.१९ मे रोजी श्री शनेश्र्वर जयंती आहे.श्री शनेश्वर जयंती निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सूर्योदय समयी श्री शनी जन्मोत्सव साजरा करण्यात येईल.त्या नंतर तैलाभिषेक,शनी होम, शनी शांती,लघुरुद्र आदीचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण दिवसभर मंदिरात प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.भक्तांनी दर्शन घेऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे ट्रस्टी प्रकाश अध्यापक यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी मंदिरात किंवा मोबाईल क्रमांक 9731577287 यावर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.