This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*चलवेनहट्टी येथे २२ रोजी महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन*

*चलवेनहट्टी येथे २२ रोजी महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे आयोजन*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयोध्या तेथे २२ जानेवारी रोजी श्री राम मंदिरचा वास्तुशांती सोहळा तसेच मुर्ती प्राणप्रतिष्ठापना होत आहे. त्या निमित्त चलवेनहट्टी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमेची ट्रॅक्टर मधून शोभायात्रा काढण्यात येणार आहे या शोभायात्रेत सुप्रसिद्ध राजा पंढरीचा हा महिला हारीपाठ असणार आहे. सकाळी दहा वाजता शोभायात्रेला सुरुवात होईल प्रत्येकांच्या अंगणात रांगोळी काढण्यात येणार असून या शोभायात्रेतचे स्वागत करण्यात येणार आहे.

तसेच प्रत्येकांच्या घरावर हिंदू आणि मराठी अस्मितेचे प्रतिक असलेला भगवा ध्वज लावण्यात येणार आहे.रात्री दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे तर गावातील सर्व मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. प्रभु श्रीराम यांच्या प्रतिमा असलेले फलक जागोजागी लावण्यात येणार असून गावात उत्साह शिगेला पोहोचला आहे. यानिमित्त गावातील सर्व मंदिरात पूजा अर्चा होणार आहे. तर सायंकाळी महाप्रसादला सुरवात होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच नवरात्र उत्सव मंडळ यांनी संयुक्तपणे तसेच गावातील इतर मंडळ आणी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे या दिवशी गावात बंदोबस्त वार (पाळणूक) पुकारण्यात आले आहे‌. तरी ग्रामस्थांनी महाप्रसादासह विविध कार्यक्रमांचे लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24