This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

EducationLocal News

*एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेजमध्ये प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे आयोजन.

*एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेजमध्ये प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे आयोजन.
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेजमध्ये प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचे आयोजन.
जी एस एस पी यु काॅलेजच्या भौतिकशास्त्र विभागाच्या “गॅलिलीओ क्लब” च्या वतीने विद्यार्थी वर्गासाठी प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये 27 संघांनी भाग घेतला, यातील 4 संघ विजेते घोषीत करण्यात आले.
गॅलिलीओ क्लब हा खगोलशास्त्र आणि तारांगण यांची सखोल माहिती व ॠतुचक्राप्रमाणे होणारे भौगोलिक परिवर्तन यांचा अभ्यास खगोलशास्त्रतुन विद्यार्थ्यास करता यावा या दृष्टीने संघाचे निर्माण काॅलेज परिसरात करण्यात आले आहे. या संघाद्वारे विद्यार्थी, प्राध्यापक,पालक यांना सृष्टीचक्रात होणारे सूर्य ग्रहण, चंद्र ग्रहण, पृथ्वीच्या कक्षेजवळ आलेले ग्रह ,तारांगण यांचे दर्शन विविध प्रकारच्या दूरबीनी, दूरदर्शक यांचा उपयोग करून संघाचे अध्यक्ष प्रा प्रवीण पाटील हे करीत आले आहेत.
सालाबाद प्रमाणे या संघाचा एक उपक्रम प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, या स्पर्धेचे उद्दीष्ट विद्यार्थी वर्गाची कल्पकता आणि ज्ञान यांची वृध्दी करून त्याच्यामध्ये खगोलशास्त्र विषयी आकर्षण निर्माण करणे .
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक शानभाग, श्री ग्यानेश कलघटगी, प्राचार्य एस एन देसाई,उपप्राचार्य सचिन पवार, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा सी बी ढवळे उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत संघ ,
I) ब्लेझींग काॅमेट्स संघातून, आदिती कामत, सायली गंभीर
II)सूपरनाॅव्हस संघातून
गणेश रायकर, प्रणव जाधव
III)ॲस्ट्रोफिल्स संघातून
तनीषका कागे, समीक्षा
IV)सेलिस्टाईल ईको संघातून
सत्यम खाण्डेकर, अलीया नदाफ
सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले
कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी स्पर्धक ,प्राध्यापक, संस्थेचे संस्थापक यांचे स्वागत प्रा सी बी ढवळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन प्रा वैशाली भारती आणि पल्लवी कामत यांनी केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24