आंतर-महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा आयोजित
25 जुलै 2023 रोजी कर्नाटक राज्य विधी विद्यापीठ, हुबळी यांनी KLE सोसायटीच्या B.V. सह आंतर-महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केल्या होत्या .या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे संगम बैलूर, उपाध्यक्ष कामटक राज्य टेबल टेनिस असोसिएशन व मानद सचिव, बेळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच या स्पर्धेला डॉ. खालिद बी. खान, संचालक शारीरिक शिक्षण, कर्नाटक राज्य कायदा विद्यापीठ, हुबळी हे सन्माननीय अतिथी होते .तसेच आर.बी बेल्लद , अधिवक्ता आणि बी.व्ही.च्या स्थानिक नियामक मंडळाचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना संगम बैलूर यांनी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ठ दर्जा कसा मिळवावा याविषयी सहभागींना प्रोत्साहन दिले. त्यांनी उत्कृष्टता मिळविण्यासाठी सहा महत्त्वाच्या युक्त्या सांगितल्या उदा. सकाळी लवकर सुरुवात करणे,यशस्वी लोकांशी मैत्री करणे, योग्य शिक्षण घेणे, सामाजिक जीवनाचा त्याग करणे आणि रागावर नियंत्रण ठेवणे. हे सांगितले .
त्यानंतर डॉ. खालिद खान याने सहभागींनी खेळीमेळीने खेळावे आणि सर्वोत्कृष्ट संघाला विजय मिळावा अशी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य बी.जयसिंह यांनी पाहुण्यांचे स्वागत केले .कु. पवित्रता पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.