This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

5 फेब्रुवारी रोजी शाळांमध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

5 फेब्रुवारी रोजी शाळांमध्ये भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

 

श्री किरण जाधव संचलित विमल फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने ” आझादी का अमृत महोत्सव ” निमित्त रविवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी शाळांमध्ये भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

 

भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाज संयोजक किरण जाधव हे विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच सामाजिक उन्नतीसाठी आपल्यापरीने कार्यरत आहेत. आपला माणूस म्हणून समाजात त्यांनी ओळख निर्माण केली आहे. समाजोन्नतीबरोबर लोकांमध्ये एकता आणि अखंडता राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

याच अनुषंगाने बेळगाव मधील शालेय विद्यार्थ्यांकरिता चित्रकला स्पर्धा आयोजिण्यात आल्या असून याकरिता विमल फाउंडेशन 206 शाळांमधील सुमारे 1.5 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे.

 

या स्पर्धेतील पहिल्या फेरीत 78 शाळा सहभागी होणार असून यामध्ये सुमारे 43 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

रविवारनंतर उर्वरित शाळांची पुढील फेरी संबंधित शाळांच्या उपलब्धतेनुसार आठवडाभरात घेतली जाणार आहे.

 

या स्पर्धेला प्रतिसाद लाभला याकरिता शाळा आणि महाविद्यालयांचे व्यवस्थापन मंडळ, शिक्षक, पालक पत्रकार यांनी विशेष सहकार्य केल्याने विमल फाउंडेशन च्यावतीने किरण जाधव यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now