एस के ई सोसाइटी च्या जी एस एस पी यु काॅलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवचे आयोजन
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही वार्षिक क्रीडा महोत्सवचे आयोजन करण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन काॅलेज क्रिडांगणावर करण्यात आले,प्राचार्य एस एन देसाई, प्रा प्रवीण पाटील,विद्यार्थी संघटना उपाध्यक्ष प्रा.अनिल खाण्डेकर, क्रिडा शिक्षक विनय नाईक, प्रकाश मंकाळे यांच्या उपस्थित झेंडा फडकवून क्रिडां आरंभ करण्यात आली,यावेळी एन सी सी कॅडेट आणि विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी वर्गाने पथसंचालन केले,राज्य स्तरीय व राष्ट्रीय खेळातील सहभागी विजेत्या स्पर्धकांनी क्रिडा ज्योतीचे संचालन करून ती मैदानात तेवत ठेवली.प्रा अनिल खाण्डेकर यांनी सर्व स्पर्धकांना खेळ सुव्यवस्थित व शिस्तबध्द रूपाने चालवनेची शपथ दिली.प्राचार्यानी खेळाची सुरवात झाल्याची घोषणा केली.
या स्पर्धेदरम्यान 100,200,400,800, 1000, 1500 मीटर धावणे, लांब उडी,उंच उडी,भाला फेक,थाली फेक, गोळाफेक,आशा अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले
यावेळी विजेत्या स्पर्धकांना मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले
विद्यार्थी वर्गा बरोबर कॉलेजच्या शिक्षक वर्गासाठी ही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, भरपूर प्रमाणात स्पर्धकानी सहभाग घेतला.
सूत्र संचलन डाॅ.अजित कोळी यांच्या नेतृत्वाखाली प्रा शुभांगी मुरकुटे, रेश्मा सपले,साक्षी कुलकर्णी, सुबदा मंगोळी, प्रज्ञा बांदवडेकर, जयश्री कनगुटकर,यांनी केले, पारितोषक वितरणाचे कार्य प्रा वैशाली भारती यांच्या नेतृत्वाखाली प्रा सोनिया चिट्टी,सविता कुलकर्णी, पल्लवी कामत,हरि राजगोळकर यांनी पाहीले, आभार प्रदर्शन प्रा अनिल खाण्डेकर यांनी केले.