जी एस एस पी यु काॅलेजच्या गणित विभागाच्या “सांख्यिकी गणित मंडळच्या” विद्यार्थी सदस्यानी 28/12/2023 राष्ट्रीय गणित दिवसाचे आयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय गणित शास्त्राचा मेरू श्रीनिवास रामानुजाचार्य यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य सचिन पवार, गणित विभाग प्रमुख प्रा सविता कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली, यावेळी रामानुजाचार्य यांनी आपल्या जीवनाच्या कमी कालावधीत अनेक अविष्कार केले जे संपूर्ण जगाला वरदान ठरले आणि याचा स्विकार ही केला.अशा या थोर गणित तज्ञाविषयी पी यु सी प्रथम वर्षाचा विद्यार्थी रचित डांगे यांनी पाॅवर पाॅईंट च्या व्दारे रामानुजाचार्यच्या संम्पूर्ण जीवन प्रवास वर प्रकाश घातला.
प्रा सविता कुलकर्णी यांनी सर्वाचे स्वागत केले, कुमारी भूमी कुगजी या विद्यार्थीने सुत्रसंचालन केले, प्रा वेदश्री देशपांडे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास सांख्यिकी संघाचे अध्यक्ष प्रा डाॅ. ममता कुट्टे,प्रा संजय जोती ,प्रा रविशंकर आनंदाचे प्रा स्वरदा दातार ,प्रा मनीषा पाटील विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.