जी एस एस पी यु काॅलेजच्या लेडीज असोसिएशनच्या वतीने नैपुण्य या कार्यक्रमात विविध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले, या अंतर्गत मेहंदी, रांगोळी, चेहरा रंगवणे,नखा वरती रंग काम ,मंडाला आर्ट,अग्नी विरहीत म्हणजे कोणत्याही प्रकारची आग जसे चूल,एल पी जी गॅस,इलेक्ट्रीक चूल आदीचा वापर न करता विविध अन्न पदार्थ तैयार करणे,टाकाऊ पासूण टिकावू वस्तू निर्माण करणे, इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले,या स्पर्धाना विद्यार्थी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळाला .
कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन प्रा सविता कुलकर्णी, प्रा सुचित्रा गवस,प्रा प्रज्ञा अंकलकोपे,प्रा सोनिया चिठ्ठी, प्रा प्रज्ञा बांदिवडेकर यांनी पाहीले.
लेडीज असोसिएशन च्या वतीने अशा प्रकारचे स्पर्धात्मक आयोजन दरवर्षी केले जाते, याचा मूळ उद्देश विद्यार्थी वर्गाने अभ्यासा बरोबर आपल्यातील कलागुणांना ही उजाळा देत नवीन जीवन यापलिकडे ही विकास गरजेचे असावे.