शिव सन्मान पादयात्रेचे आयोजन
राजकारणी लोकांना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त निवडणुकी पुरते आठवतात. पाच वर्षातून एकदाच फक्त महाराज त्यांच्या निदर्शनास येतात मात्र, जेव्हा महाराजांचा अपमान आणि अवमान होत असतो त्या वेळेस मात्र राजकारणी लोक मूग गिळून गप्प बसतात त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान रोखण्याकरिता शिव सन्मान पद यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीयध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी दिली.
आज शहरात जातीमठ येथे पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती यावेळी शिव सन्मान पदयात्रेबाबत माहिती देताना ते म्हणाले की राजहंस गडापासून उद्या सकाळी सात वाजता या शिवसन्मान पदयात्रेस सुरुवात होणार आहे. पदयात्रा सलग पाच दिवस चालणार असून शहरातील रेल्वे स्थानकावर याची सांगता होणार आहे.
या पदयात्रेत अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल होणारा अवमान आणि चाललेले राजकारण येणार असून रोज नियोजित केलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल प्रबोधन आणि प्रवचन करण्यात येणार असल्याची माहिती रमाकांत कोंडुस्कर यांनी दिली.
उद्यापासून सुरू होणारी ही पदयात्रा विविध गावांमधून फिरवून दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. पहिल्या दिवशी राजहंस गड येथून यरमाळा अवचारहट्टी देवगनहट्टी धामणे या गावात फिरणार आहे तर सायंकाळी येळ्ळूर येथे जनजागृती प्रबोधन कार्यक्रम आणि प्रवचन केले जाणार आहे.
तर दुसऱ्या अशाच प्रकारे विविध मार्गात फिरवून मराठी संस्कृती मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान जपण्यासाठी भ्रष्टाचाराचे षडयंत्र उधळून लावण्यासाठी आणि रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यास भाग पाडण्यासाठी मराठी तरुणांना व्यसनाधीतेपासून दूर ठेवण्यासाठी राजकीय स्वार्थ ठेवून तरुण पिढीला वाम मार्गाला लावणाऱ्या राजकारणी लोकांना वाटणीवर आणण्यासाठी जनजागृती केली जाणार असल्याची माहिती यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी दिली.