रांगोळी स्पर्धेचे आयोजन: विजेत्याला प्रथम पारितोषिक दहा हजार रोख रक्कम
एंजल फाउंडेशन आणि डि मिडिया यांच्यावतीने भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा 5 नोव्हेंबर रोजी 9 वाजता सुरू होणार आहे.
या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विजेत्यांना दहा हजार रुपये प्रथम क्रमांक सात हजार रुपये द्वितीय क्रमांक आणि तीन हजार रुपये तृतीय क्रमांक पारितोषिक ठेवण्यात आली असून विजेत्यांना रोख रक्कम प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच ही स्पर्धा जैन दिगंबर बोर्डिंग माणिक बाग ओल्ड पीबी रोड रेणुका देवी मंदिर च्या मागील बाजूस पार पडणार आहे.
या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धांना चार बाय चार साईज मध्ये रांगोळी काढावी लागणार आहे. तसेच रांगोळी करिता 1.30 तासाचा वेळ देण्यात आला असून स्पर्धकांनी स्वतःचे साहित्य स्वतःबरोबर आणावे तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता शंभर रुपये प्रवेश फी आकारण्यात आली आहे.
सदर भव्य रांगोळी स्पर्धा ही वेळेवर पूर्ण होणार असून स्पर्धकांनी दिलेल्या वेळेच्या अर्धा एक तास आधी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.