8 ते 12 जानेवारी 2024 पासून बेळगावात आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन मुले आणि मुलींच्या हॉकी स्पर्धेचे आयोजन केले आहे.येथील नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदान टिळकवाडी येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.
आज हॉकी बेळगाव मंडळाचे सदस्य गुलाप्पा बी होसमनी – अध्यक्ष हॉकी बेळगाव व माजी बुडा अध्यक्ष, शंकर गौडा पाटील – माजी बुडा अध्यक्ष विनोद पुंडलिक पाटील- उपाध्यक्ष, सुधाकर चाळके – सरचिटणीस, उत्तम शिंदे – सेवानिवृत्त उप/ मेजर हॉनी कॅप्टन.नामदेव सावंत , राजेंद्र पाटील आणि डॉ सोनाली सरनोबत यांच्या उपस्थितीत हॉकी स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी मुले आणि मुलींचा संघ : एकूण २१ संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये पूल ए कॉलेज गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वतीदेवी कॉलेज, गोविंदराम सेकसरिया सायन्स कॉलेज, सांगोली रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज, पीपल ट्री कॉलेज सहभागी झाला आहे.
तर पूल बी कॉलेज : गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, राणी पार्वतीदेवी कॉलेज, गोविंदराम सेकसरिया सायन्स कॉलेज, सांगोली रायण्णा कॉलेज, लिंगराज कॉलेज, बी के कॉलेज पूल सी स्कूल-एमआर भंडारी हायस्कूल, ज्ञान मंदिर हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल, वाय एम शानभाग हायस्कूल. पूल डी स्कूल एमआर भंडारी हायस्कूल, जीजी चिटणीस हायस्कूल, ज्ञान मंदिर हायस्कूल, सेंट. झोन हायस्कूल काकती सहभागी झाले आहेत.
यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी खेळ आणि शिक्षणाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले . यावेळी त्यांनी आरोग्य आणि स्वच्छता तंदुरुस्तीसाठी खेळाडूंनी घ्यावयाचा आहार याविषयी सांगितले. पुढील काही दिवसांत आरोग्य आणि संपूर्ण आहार योजना टिप्स देण्यासाठी पुन्हा भेट देणार असल्याचे सांगितले जेणेकरून खेळाडूंना फायदा होईल.
तसेच त्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बेळगावचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मदत करणार असल्याची ग्वाही त एनजीओ नियती फाउंडेशनच्या माध्यमातून दिली .