दिवाळीनिमित्त परंपरा जोपर्यंत असण्याकरिता सांबरा येथे दरवर्षी माणसांनी बैलगाडी ओढण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर्यन चौगुले यांच्या हस्ते माणसाने बैलगाडी ओढण्याची शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर येथील स्पर्धा सुरुवात करण्यात आली.
यावेळी डॉ एन बी जोई, कंग्राळी बी के ग्रामपंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील, इराप्पा जोई, काशीनाथ धर्मोजी, नागेश देसाई दिलीप चव्हाण व गावातील प्रमुख मंडळी तसेच युवा वर्ग मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.