रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानत विश्वकर्मा सेवा संघाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संघातील सर्व सदस्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रक्तदान श्रेष्ठदान समजणारे विनायक दाखलूचे यांनी 191 वेळा रक्तदान केल्यामुळे त्यांचा संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी संकलित केलेले रक्त बेलगाम ब्लड बँक ला देण्यात आले.
तसेच संघाच्यावतीने बिडी खानापूर येथे राहणारे श्रीकांत हनुमंत सुतार यांना अपंग संघटना शहापूर यांच्या सहकार्याने सायकलचे वितरण करण्यात आले.
विश्वकर्मा सेवा संघाने या वर्षभरात अनेक कार्य केले आहेत. गरीब मुलांच्या शिक्षणाकरिता आर्थिक मदत, महिलांना शिवण काम देऊन मदत केली आहे. त्याचबरोबर कलाकारांना वाव देण्याचे काम विश्वकर्मा सेवा संघाने कार्य केले आहे.त्यामुळे पहिल्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. आणि अशाच प्रकारे संघाने दरवर्षी कामे केली पाहिजे असे प्रोत्साहन सर्व सदस्यांना देण्यात आले.
यावेळी या वर्धापन कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष रमेश दिसुरकर, संजय सावंत, खानापुर तालुका अध्यक्ष जोतिबा सुतार, संदीप मंडोळकर, नामदेव सुतार, जोतिबा लोहार यांच्यासहित संघाचे सदस्य व विश्वकर्मा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.